पुण्याच्या कात्रज प्राणिसंग्रहालयातील ‘प्रियदर्शनी’ वाघिणीचा वृध्दापकाळाने मृत्यू
पुणे: पुण्यातील कात्रज प्राणीसंग्रहातील 21 वर्षीय पट्टेरी ‘प्रियदर्शनी’ वाघिणीचा काल (दि.१) शुक्रावारी सायकांळी वृध्दापकाळाने मृत्यू झाला आहे. सोळा वर्षांपूर्वी पुुणे महापालिकेच्या पेशवे उद्यानात नंदिणीचा जन्म झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियदर्शनी गेल्या तीन-चार दिवसांपासून आजारी होती. तिचे खाणे पिणे देखील कमी झाले होते. मागील पाच वर्षांपासून वार्धक्यामुळे तिला व्यवस्थित चालता येत नव्हते तसेच तिच्या अंगाला जखमाही झाल्या होत्या. त्यामुळे तिला पर्यटकांना देखील दाखवण्यात येत नव्हते. दरम्यान, शवविच्छेदन केल्यानंतर प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव म्हणाले की, सर्वसाधरण 16 ते 18 वर्ष वाघांचे वय असते. एक ते दोन महिने प्रियदर्शनी जगेल अशी आशा आम्हाला होती.परंतु, तिने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे आता प्राणीसंग्रहालयातील वाघांची संख्या आता आठवरून सात झाली आहे.