सलग तिसर्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
मुंबई: सलग तीन दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होताना दिसत आहे. शनिवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देशभर वाढलेल्या दिसून आल्या. देशातील मोठ्या शहरांमध्ये नोंद करण्यात आलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शंभरीपार गेल्या. त्यामुळे आज देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती सर्वाधिक झाल्याची देखील नोंद करण्यात आली आहे.
आज पेट्रोलच्या किंमतीत २५ पैशांची वाढ केली आहे. तर डिझेलचे दर ३० पैसे प्रति लीटरने वाढले आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोल ११० रुपये लीटरच्या पुढे गेले आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सर्वात महाग इंधनाची विक्री होत आहे. मध्यप्रदेशातील सिवनीमध्ये पेट्रोल ११३.२८ रुपये प्रति लीटर आणि राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये ११३.०१ रुपये प्रति लीटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे.
राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलच्या किंमती प्रतिलीटर १०२.१४ रुपये इतकी झाली आहे. आर्थिक राजधानी मुंबईत हाच आकडा १०८.१९ रुपये प्रतिलीटर इतका वाढला आहे. त्याचवेळी या दोन्ही राजधान्यांमध्ये डिझेल्या किंमती अनुक्रमे ९०.४७ रुपये आणि ९८.१६ रुपये इतकी झाली आहे.
कोलकात्यामध्ये पेट्रोल १०२.७७ रुपये प्रतिलीटर तर डिझेल ९३.५७ रुपये प्रतिलीटर दराने विकलं जात आहे. चेन्नईमध्ये हे दर अनुक्रमे ९९.८० रुपये आणि ९५.०२ रुपयेप्रतिलीटर अस आहेत. तसेच पुण्यात आज पेट्रोलचा दर १०७.७१ रुपये लिटर झाला असून डिझेलचा दर ९६.१९ रुपये लिटर झाला आहे.