अमरावती जिल्हा सहकारी बँक निवडणूक: राज्य मंत्री बच्चू कडू विजयी, पण पॅनलच काय?

9

अमरावती: संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत  राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विजय मिळवत परिवर्तन पॅनलचं खातं उघडलं आहे. अमरावती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री बच्चू कडू हे या निवडणुकीच्या निमित्त आमने सामने आल्यानं सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडं लागलं होतं.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काल निवडणूक पार पडली, यात परिवर्तन व सहकार पॅनल होते यात राज्यमंत्री बच्चू कडू हे सुद्धा परिवर्तन पॅनल कडून निवडणूक रिंगणात होते आज मतमोजणी पार पडली यात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलु उर्फ अनिरुद्ध देशमुख यांचा पराभव करत बच्चू कडू यांनी दोन मतांनी विजय मिळवला यात बच्चू कडू विजयी होताच समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.

अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची आज मतमोजणी होत असून संपूर्ण राज्यातील राजकीय नेत्यांचं लक्ष अमरावतीकडं लागलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारमधील महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर व राज्यमंत्री बच्चू कडू हे आमने सामने आले आहेत. जिल्हा बँकेत काँग्रेसची सलग 10 वर्ष सत्ता होती. ही सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके,राज्यमंत्री बच्चू कडूंसह इतर नेते एकत्र आले आहेत.

आतापर्यंत हाती आलेले निकाल

सहकार पानेल 8 विजयी उमेदवार

1 वीरेंद्र जगताप चांदूर रेल्वे

2 श्रीकांत गावंडे धामणगाव

3 सुरेश साबळे तिवसा

4 सुधाकर भारसाकडे दर्यापूर

5 हरिभाऊ मोहोड भातकुली

6 सुनील वऱ्हाडे अमरावती

7 दयाराम काळे चिखलदर

8 प्रकाश काळबांडे सहकारी पत संस्था…

परिवर्तन पॅनल चे विजयी उमेदवार

1 राज्यमंत्री बच्चू कडू चांदूरबाजार

2 चित्रा डहाने मोर्शी

3 अजय मेहकरे अंजनगाव सूर्जी

4 जयप्रकाश पटेल धारणी

अपक्ष विजयी उमेदवार

1 अभिजित ढेपे नांदगाव खंडेश्वर

2 नरेशचंद्र ठाकरे वरुड

3 आनंद काळे अचलपूर

 

Get real time updates directly on you device, subscribe now.