दिल्लीची चेन्नईवर मात, 3 गडी राखून दणदणीत विजय; गुणतालिकेत अव्वलस्थानी

मुंबई: इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या हंगामातील गुणतालिकेत अव्वल स्थानी असणाऱ्या दोन्ही संघामध्ये 50 वा सामना पार पडला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवलेल्या या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (हे संघ आमने सामने होते. अत्यंत चुरशीचा झालेला हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंच गेला. पण अखेर दिल्लीने 3 गडी राखून गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या चेन्नईला मात देत सामना जिंकला.

सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्ली कॅपिटल्स संघाने गोलंदाजी निवडली होती. जो निर्णय दिल्लीने बरोबर करत चेन्नई संघाला अवघ्या 136 धावांत आटोपलं. दिल्लीकडून अक्षर पटेलने 2 तर आवेश खान, नॉर्खिया आणि आश्विन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतला. पण सर्वच गोलंदाजनी अतिशय कमी धावा देत चेन्नईला 136 धावांवर रोखलं.

दिल्ली गुणतालिकेतही अव्वल

सामना सुरु होण्यापूर्वी चेन्नई आणि दिल्ली या दोन्ही संघानी 12 सामन्यांपैकी 9 सामने जिंकले असले तरी चेन्नईने अधिक नेट रनरेटच्या जोरावर पहिलं स्थान मिळवलं होतं. पण आता दिल्लीने चेन्नईला नमवत 13 सामन्यांपैकी 10 सामने जिंकत 20 गुण खात्यात मिळवले आहेत. ज्यामुळे ते गुणतालिकेतही पहिल्या स्थानी पोहोचले आहेत.