अपघातग्रस्तांना मदत करा, आणि 5000 मिळवा, सरकारची नवी योजना

12

मुंबई: रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना वेळीच मदत मिळाली तर त्यांचा जीव वाचू शकतो. हाच उद्देश समोर ठेऊन केंद्र सरकारने एक योजना तयार केली आहे. रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेणाऱ्यांना रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनतंर्गत जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तीला 5 हजार रुपयांचं बक्षिस देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहचवणाऱ्या व्यक्तीला 5 हजार रुपयांचे रोख बक्षिस मिळणार आहे. केंद्र सरकारने ही योजना सुरू केली असून 15 ऑक्टोबर पासून संपूर्ण भारतात ही योजना लागू केली जाणार आहे. भारतीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्यांच्या आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून याबाबत सूचित केले आहे. ही योजना 31 मार्च 2026 पर्यंत प्रभावी राहणार आहे. मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील परिवहन सचिवांना योजनेशी संबंधित पत्र पाठवण्यात आलं आहे.

रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला एका तासाच्या आत रुग्णालयात पोहोचवल्यास, मृतांची आकडेवारी अतिशय कमी होऊ शकते. देशात दरवर्षी जवळपास 1.5 लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. रस्ते वाहतूक मंत्रालयाने याच उद्देशाने ही योजना लाँच केली आहे. मंत्रालयाने चांगल्या सहकार्यासाठी मदत पुरस्कार देण्याच्या या योजनेसंबंधी निर्देश जारी केले आहेत. या योजनेचा उद्देश रस्ते अपघात झालेल्या व्यक्तीला लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवणं हा आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.