कोल्हापूर हादरलं! सात वर्षाच्या मुलाचा मृतदेह हळद, कूंकू लावलेल्या अवस्थेत सापडला

कोल्हापूर: महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. कागल तालुक्यातील लहान मुलाचं अपहरण करुन खून केल्याची घटनेला काही दिवस होत नाही, तोच आणखी एका सात वर्षाच्या मुलाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. मुलाच्या अंगावर हळद, कूंकू, गुलाल टाकलेला असल्यानं नरबळी असल्याचं संशय व्यक्त केला जात आहे.

मुरगुड (जि. कोल्हापूर) येथे एका चिमुकल्याचं अपहरण खून केल्यानंतर नरबळी घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावात सात वर्षाच्या बालकाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे.

आरव केशव केशरे असं मयत बालकाचं नाव आहे. आरव दोन दिवसांपासून घरातून गायब होता. याप्रकरणी त्याच्या वडिलांनी अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. त्याबरोबर ग्रामस्थांनीही वेगवेगळ्या ठिकाणी आरवची शोधाशोध सुरू केली होती. तर दुसरीकडे शाहूवाडी पोलिसांनी आरवच्या शोधासाठी पोलीस पथक पाठवली होती. आरवचा शोध सुरू असतानाच मंगळवारी (5 ऑक्टोबर) सकाळी सहा वाजता आरवचा मृतदेह त्याच्याच घराच्या पाठीमागे आढळून आला. आरवच्या अंगावर गुलाल, हळद आणि कूंकू टाकण्यात आलेलं होतं. संशयास्पद अवस्थेत आरवचा मृतदेह सापडला असून, नरबळी प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास शाहूवाडी पोलिसांनी सुरू केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!