‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यानं घेतला जगाचा निरोप, अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं निधन

मुंबई: दूरदर्शनवरील प्रचंड गाजलेल्या ‘रामायण’ या धार्मिक मालिकेमध्ये रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचं मंगळवारी रात्री उशिरा निधन झालं. अरविंद त्रिवेदी हे 83 वर्षांचे होते. मंगळवारी (5 ऑक्टोबर) रात्री 11 वाजता त्यांनी घरीच शेवटचा श्वास घेतला.

अरविंद त्रिवेदी हे दीर्घकाळापासून आजारी होते. मंगळवारी रात्री उशिरा त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांच्या अवयवांनी काम करणे बंद केले होते. अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात झाला. गुजराती रंगभूमीपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याचा भाऊ उपेंद्र त्रिवेदी हे गुजराती चित्रपटसृष्टीचे सुप्रसिद्ध नाव आहे आणि त्यांनी गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे

रामायणातील रावणाच्या भूमिकेनं अजरामर झालेल्या त्रिवेदी यांनी ‘विक्रम और बेताल’ मालिकेतही महत्तवाची भूमिका साकारली होती. त्याशिवाय गुजराती सिनेसृष्टीमध्ये देखील त्यांचं मोठं नाव होतं. अरविंद त्रिवेदी यांनी रावणाचे इतके शक्तिशाली पात्र साकारले की त्याच्या समोरचे इतर सर्व कलाकार अजूनही टीव्हीवर फिकट दिसतात. लोकांना अजूनही तो मोठा आवाज आणि त्यांची चालण्याची शैली आवडते. जेव्हाही रामायण टीव्हीवर यायचे, प्रेक्षक त्यांच्या आवडत्या रावणाला पाहण्यासाठी बसतात. अरविंद त्रिवेदी यांचे रावणाचे पात्र इतके लोकप्रिय होते की राम लीलामध्ये हे पात्र साकारणारा प्रत्येक पात्र त्यांच्या भूमिकेतून प्रेरणा घेत असे.

३०० चित्रपटांमध्ये केले होते काम

अरविंद त्रिवेदी यांनी रामानंद सागरच्या रामायणात रावण बनून प्रेक्षकांची मने जिंकली, तर दुसरीकडे, त्याने अनेक गुजराती चित्रपटांमध्ये त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने स्वतःसाठी मोठे स्थान निर्माण केले होते. त्यांनी जवळजवळ ४० वर्षे गुजराती चित्रपटात योगदान दिले. यासह, ते विक्रम आणि वेताळसाठी देखील ओळखला गेले होते. अरविंद त्रिवेदी यांनी हिंदी आणि गुजराती चित्रपटांसह सुमारे ३०० चित्रपटांमध्ये काम केले होते.