धुळ्यात चंद्रकांत पाटलांच्या लेकीचा दिमाखात विजय; धरती देवरे यांनी मारली बाजी

15

धुळे: राज्यात जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडलं आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासा भाजपला केवळ 2 जागांची गरज आहे. गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांची कन्या जिल्हा परिषद निवडणुकीत धरती देवरे या लामकने गटातून विजयी झाल्या आहेत.  धरती देवरे लामकने गटातून भाजप कडून निवडणूक लढवत होते. धरती देवरे या गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या आहेत. गेल्या वेळेस धरती देवरे बिनविरोध विजयी झाल्या होत्या.

जिल्हा परिषदेच्या 15 आणि पंचायत समितीच्या 30 जागांसाठी मतदान प्रक्रिया जाहीर झाली. त्यापैकी एका गटात शिवसेनेचा उमेदवार आणि दोन पंचायत समिती गणात बिनविरोध निवडणूक पार पडली. त्यामुळे प्रत्यक्ष 14 जिल्हा परिषद गट आणि 28 पंचायत समिती गणात मतदान झालं आहे. धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता होती. जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागांपैकी भाजपकडे 27 जागा आहेत. तर शिवसेनेकडे 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3 आणि काँग्रेसकडे 6 जागा आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला एका जागांची आवश्यकता आहे.

भाजपला जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी अवघ्या दोन जागांची आवश्यकता आहे. असं असतानाही त्या जागाही महाविकास आघाडी भाजपला मिळू देणार नाही, असा दावा काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी केलाय. इतकंच नाही तर ज्या अपक्षांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला होता ते देखील यावेळी भाजपचा पाठिंबा काढून घेतील, असंही कुणाल पाटील यांनी म्हटलंय.

मागील निवडणुकीत धुळे जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल

भाजप – 39

काँग्रेस – 7

शिवसेना – 4

राष्ट्रवादी – 3

अपक्ष – 3

Get real time updates directly on you device, subscribe now.