महेंद्रसिंग धोनी ‘या’ दिवसा पर्यंत खेळणार आयपीएल; जाणून घ्या….

3

मुंबई: चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने हे स्पष्ट केले की तो कमीत कमी आणखी एका सत्रात आपल्या आवडीची पिवळी जर्सी घालणार आणि  ‘व्हिसल पोडु’निश्चितपणे आपल्या प्रिय चेपॉक मैदानात अलविदा सामना खेळताना पाहू शकेल. धोनीच्या निवृत्तीवरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती.मात्र मंगळवारी त्याने पहिल्यांदा स्पष्ट संके दिले की तो आगामी सत्रात खेळताना दिसणार आहे कारण आयपीएलच्या पुढील लिलावात मोठे बदल होणार आहेत.

धोनीने इंडिया सिमेंट्सच्या ७५व्या जल्लोषानिमित्त चाहत्यांशी बोलताना सांगितले, जोपर्यंत निवृत्तीची गोष्ट आहे तर तुम्ही आजही येऊ शकता आणि सीएसकेसाठी खेळताना पाहू शकता आणि हा माझा शेवटचा सामना असू शकतो. तुम्हाला मला अलविदा म्हणण्याची संधी मिळेल. मला आशा आहे की आम्ही चेन्नईत खेळू आणि तेथील चाहत्यांना भेटू शकतो.

चेन्नईचा कॅप्टन आणि विकेटकीपर असलेल्या धोनीने हैदराबाद विरुद्धच्या या मॅचमध्ये तीन कॅच घेतले. एकाच मॅचमध्ये तीन किंवा जास्त कॅच घेण्याची कामगिरी धोनीने आयपीएलमध्ये दहाव्यांदा केली. आयपीएलमध्ये एका मॅचमध्ये तीन किंवा जास्त कॅच घेण्याची कामगिरी दहा वेळा करणारा धोनी हा पहिला खेळाडू आहे. धोनीने चौथ्या ओव्हरमध्ये हेझलवूडच्या बॉलवर जेसन रॉयचा कॅच घेतला. नंतर अकराव्या ओव्हरमध्ये ब्राव्होच्या बॉलवर प्रियम गर्गचा कॅच घेतला आणि तेराव्या ओव्हरमध्ये रविंद्र जडेजाच्या बॉलवर वृद्धिमान साहाचा कॅच घेतला.

Get real time updates directly on you device, subscribe now.