गायीला वाचवताना डबल डेकर बस अन् ट्रकमध्ये भीषण अपघात, 13 प्रवाशांचा मृत्यू

लखनऊ: लखनऊला लागून असलेल्या बाराबंकीमध्ये डबल डेकर बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून तर 25 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, यात ट्रक तुकडे तुकडे झाले आहेत. उत्तरप्रदेशातील लखनऊ शेजारील बाराबंकी  जिल्ह्यातील बबुरिया गावाजवळ हा अपघात झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये महिला आणि मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सर्वांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. ही टक्कर इतकी जोरदार होती की ट्रक आणि बसचे तुकडे झाले, पण टक्कर कशी झाली? हा प्रश्न निर्माण होत आहे.

गायीला वाचवताना अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, आऊटर रिंगरोडच्या किसान मार्गावर गाय वाचवण्याचा प्रयत्न करत असताना समोरून येणाऱ्या वाळूने भरलेल्या ट्रकला डबल डेकर बसची धडक झाली. पोलिसांनी सर्व जखमींना बाहेर काढले आणि त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवले, तेथून सुमारे पाच ते सहा गंभीर जखमींना लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. या अपघातावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दु:ख व्यक्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!