मिसळ खाण्यासाठी आलेल्या महिलेचा हॉटेल मालकाकडून विनयभंग

पिंपरी: आळंदी येथील नगरपालिकेच्या हॉटेल मध्ये मिसळ खाण्यासाठी एक महिला आली असता  हॉटेल मालकांने तीच्याकडून पैसे घेतले नाहीत. त्यानंतर महिला हॉटेलमधून बाहेर जात असताना तिचा हात पकडून हॉटेल चालकाने तिच्याशी गैरवर्तन केले. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री उशीरा उघडकीस आली.

पद्माकर शंकर काळे (वय 54, रा. वडगाव रोड आळंदी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडीत महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, फिर्यादी महीला आरोपीच्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी हॉटेलमध्ये मिसळ खाल्ली. आरोपीने फिर्यादी यांच्याकडून पैसे घेतले नाहीत. त्यानंतर फिर्यादी हॉटेलमधून बाहेर जात असताना आरोपीने त्यांचा हात पकडला आणि त्यांच्याशी गैरवर्तन केले. त्यास फिर्यादी यांनी विरोध केला असता आरोपीने फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी देत, महिलेचा विनयभंग केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!