कोल्हापूर घटनेचा पर्दाफास: पत्नीच्या अनैतिक संबंधांचा संशय, मुलाची हत्या करुन नरबळी भासवण्याचा प्रयत्न

कोल्हापूर: वारणा कापशी (ता. शाहूवाडी) येथील बेपत्ता झालेल्या ६ वर्षाच्या बालकाचा हळद, कुंकू, गुलाल टाकल्याचा मृतदेह मंगळवार (दि५) रोजी सकाळी आढळून आला होता. हा नरबळीचा प्रकार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्या दिशेने पोलिसांनी तपासाला सुरूवातही केली होती. मात्र या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. बापानेच पोटच्या गोळ्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बालकाच्या मृतदेहाच्या शेजारी गुलाल आणि कुंकू आढळल्याने नरबळीची शंका उपस्थित झाली होती.
बालकाच्या मृतदेहाच्या शेजारी गुलाल आणि कुंकू आढळले होते. हत्या करुन नरबळी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न त्याने केला होता. बापानेच मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्यादही दिली होती. दोन दिवसांपासून चिमुकला घरातून गायब असल्याने अपहरणाची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र कोल्हापूर पोलिसांनी 24 तासात हत्या प्रकरणाचा छडा लावला.
काय आहे प्रकरण
कोल्हापूरच्या शाहुवाडी परिसरातील कापशी गावात राहणाऱ्या सात वर्षीय बालकाच्या हत्येप्रकरणी वेगळाच खुलासा झाला आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह त्याच्याच घराच्या पाठीमागे सापडला होता. बापानेच आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप होत आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधातून मुलगा झाल्याचा पतीला संशय होता. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन दोघांमध्ये वाद होते.