RCB vs SRH : हैदराबदाचा 4 धावांनी विजयी

13

मुंबई: आयपीएलच्या ५२व्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादचा चार धावांनी विजय झाला. हैदराबादला प्ले ऑफ राउंडची आणखी एक मॅच खेळायची आहे. या मॅचचा निकाल काहीही लागला तरी हैदराबादचे आयपीएलमधील आव्हान प्ले ऑफ राउंडमध्येच संपणार आहे. तर हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये पराभव होऊनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पुढच्या फेरीत खेळणार आहे.

अबुधाबीत झालेल्या मॅचमध्ये टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या बंगळुरूने हैदराबादला २० ओव्हरमध्ये सात बाद १४१ या धावसंख्येवर थोपवले. धावांचा पाठलाग करणाऱ्या बंगळुरूला वीस ओव्हरमध्ये सहा बाद १३७ धावा एवढीच मजल मारता आली. यामुळे हैदराबादचा चार धावांनी विजय झाला. हैदराबादचा केन विल्यमसन मॅन ऑफ द मॅच झाला. त्याने २९ बॉल खेळून चार फोर मारत ३१ धावा केल्या. तसेच उत्कृष्ट फिल्डिंग करुन बंगळुरूच्या डॅन ख्रिस्तिअन आणि शाहबाझ अहमद या दोघांना कॅच आऊट तर  ग्लेन मॅक्सवेलला रन आऊट (धावचीत) केले.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादकडून जेसन रॉयने ४४, अभिषेक शर्माने १३, केन विल्यमसनने ३१, प्रियम गर्गने १५, अब्दुल समदने १, वृद्धिमान साहाने १०, जेसन होल्डरने १६, राशिद खानने नाबाद ७ धावा केल्या. बंगळुरूच्या हर्षल पटेलने ३, डॅन ख्रिस्तिअनने २, जॉर्ज गार्टनने १ आणि युझवेंद्र चहलने १ विकेट घेतली.

बंगळुरूकडून विराट कोहलीने ५, देवदत्त पडिक्कलने ४१, डॅन ख्रिस्तिअनने १, के. एस. भारतने १२, ग्लेन मॅक्सवेलने ४० (रन आऊट/धावचीत), एबी डीविलिअर्सने नाबाद १९, शाहबाझ अहमदने १४, जॉर्ज गार्टनने नाबाद २ धावा केल्या. हैदराबादकडून उमरान मलिक, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, जेसन होल्डर आणि राशिद खान या पाच बॉलरनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Get real time updates directly on you device, subscribe now.