कोण आहे जया भारद्वाज, जिला भरमैदानात चहरने केलं प्रपोज; जाणून घ्या

मुंबई: चेन्नईच्या संघाविरूद्ध पंजाबने अवघ्या १३ षटकात सामना निकालात काढला. चेन्नईने २० षटकात ६ बाद १३४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार राहुलने नाबाद ९८ धावांची खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. CSKने सामना जरी गमावला असला तरी चेन्नईच्या दीपक चहरने मात्र मैदानाबाहेर एक वेगळा सामना जिंकला.

च नंतर दीपक चहरने स्टँडमध्ये त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाज हिला एक रिंग दाखवली. नंतर तो तिथेच पायरीवर एक पाय गुडघ्यात दुमडत अर्धवट उभा राहिला. दीपक चहरने या स्थितीत उभे राहून जयाला प्रपोझ केले. जयाने दीपकच्या प्रस्तावाचा स्वीकार केला. यानंतर दीपकने जयाच्या बोटात अंगठी घातली आणि उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कोण आहे जया भारद्वाज

हिंदी बिग बॉस स्पर्धेचा माजी स्पर्धक सिद्धार्थ भारद्वाज याची बहीण आहे जया भारद्वाज. मागील अनेक दिवसांपासून जया दीपकला भेटण्याच्या निमित्ताने चेन्नईच्या मॅचवेळी स्टेडियममध्ये बसलेली दिसली. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच जया आणि दीपक यांच्या अफेअरची चर्चा सुरू आहे. पण दीपकने प्रपोझ करेपर्यंत दोघांनीही या मुद्यावर सार्वजनिकरित्या भाष्य करणे टाळले होते.  जया भारद्वाज मुंबई विद्यापीठाची पदवीधर आहे आणि एका कॉर्पोरेट कंपनीत जबाबदारीचे पद सांभाळते. ती मूळची दिल्लीकर आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच दीपकने जयाची ओळख टीम इंडिया आणि चेन्नई सुपरकिंग्समधील सहकाऱ्यांशी करुन दिली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!