घरातच गांजाची विक्री करणाऱ्याला तरुणाला सापळा रचून अटक

पुणे: घरातच गांजा विक्री करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाला तरुणाला सासवड पोलिसांनी सासवड शहर परिसरातून ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रशांत उर्फ नाना गणेश पासलकर, वय २५, रा. खंडोबानगर, सासवड, ता. पुरंदर, असे आहे .

आरोपीकडून पोलिसांनी ६३ हजार ५०० रुपयांचा सव्वा चार किलो गांजा व एक चारचाकी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. सोमवारी (ता. ०५) एका गुप्त खबऱ्या कडून माहिती मिळाली की, सासवड शहरातील खंडोबानगर झोपडपटटी मध्ये प्रशांत पासलकर हा घरामध्ये गांजाची विक्री करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के, पोलीस अंमलदार गणेश पोटे, निलेश जाधव, जब्बार सय्यद, लियाकत अली मुजावर, लियाकअली मुजावर यांचे एक पथक तयार केले. व तालुका कार्यकारी दंडाधिकारी दत्तात्रय गवारी यांच्यासह जावुन खात्री करून छापा टाकला. छापा टाकला असता त्या ठिकाणीप्रशांत पासलकर हा घरामध्ये त्याच्या समोर एक स्टीलचा पत्र्याचा डब्बा व प्लास्टिक पिशव्या घेवुन बसलेला दिसला.

पोलिसांनी पासलकर याला ताब्यात घेतल्यावर त्याला त्याचे नाव व पत्ता विचारला असता वरीलप्रमाणे सांगितला. तसेच त्याचे जवळ असलेल्या डब्यात गांजा भरलेला मिळुन आला तसेच विक्रीसाठी बाजुला गांजा भरलेल्या प्लास्टीकच्या पिशव्या मिळुन आल्या. त्याची झडती घेतली असता गांजा विक्रीतून मिळालेली रोख रक्कम २० हजार ५०० रुपये मिळुन आली. तसेच गांजा आणण्यासाठी वापरत असलेली चारचाकी गाडी मिळुन आली.