आमदार रवी राणांच्या अडचणी वाढल्या; आमदारकी धोक्यात?

4

अमरावती: बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यासमोरी अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 10-ए अंतर्गत अपात्र ठरविण्यासाठी सुरू करण्यात आलेली कारवाई तत्काळ पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दिले निर्देश. सुनील खराटे आणि सुनील भालेराव यांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांच्याविरोधात सोमवारी न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला हे आदेश दिले. रवी राणा यांच्यावर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचा आरोप आहे. 28 लाख निवडणूक खर्च करण्याची मर्यादा असताना रवी राणा यांनी 41 लाख 88 हजार 402 रुपये खर्च केले होते, तसा अहवाल तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी निवडणूक आयोगाला दिला होता.

यासंदर्भात आमदार रवी राणा यांना लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 10-ए अंतर्गत अपात्र ठरविण्यासाठी सुरू करण्यात आलेली कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दिले. न्यायालयाने कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याने रवी राणा यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार आता निवडणूक आयोग त्यांना अपात्र ठरवण्याची कारवाई कधीपर्यंत करणार, याकडे याचिकाकर्त्यांसह सगळ्यांचंच लक्ष असणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.