200 कोटींचे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण; अभिनेत्री नोरा फतेहीला ईडीकडून समन्स

मुंबई: अभिनेत्री नोरा फतेहीला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. नोराला आज चौकशीसाठी बोलावले आहे. नोरा ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली आहे.  त्यामुळे आता या प्रकरणी काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. 200 कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात  सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पत्नी अभिनेत्री लीना पाल  तुरुंगात आहेत.

दरम्यान, सुकेशने नोरा फतेहीलाही आपल्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता. याआधी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस  आणि अभिनेता सोनू सून ईडीच्या जाळ्यात अडकले होते. आता ईडीच्या जाळ्यात नोरा आडकली आहे. पण याप्रकरणी नोराकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही.

याआधी जॅकलिनचीही ईडीने चौकशी केली होती. आधी ईडीला वाटले की, जॅकलिन या प्रकरणात सामील आहे, पण नंतर कळले की ती या प्रकरणाची व्हिक्टीम आहे. सुकेशने लीना पॉलच्या माध्यमातून जॅकलिनची फसवणूक केली होती. जॅकलीनने ईडीला दिलेल्या पहिल्या निवेदनात सुकेशशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती शेअर केली होती. अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आज (14 ऑक्टोबर) होणाऱ्या चौकशीत नोरा सहभागी होईल की, नाही हे अद्याप ठरलेले नाही. सुकेशचंद्र शेखर आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री लीना पॉल तिहार जेलच्या आतून 200 कोटी रुपये उकळल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. असे सांगितले जात आहे की, इतर लोकांप्रमाणेच सुकेशने नोरा फतेहीला त्याच्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता. नोरा आणि जॅकलिन व्यतिरिक्त सुकेशच्या निशाण्यावर अनेक बॉलिवूड कलाकार आणि चित्रपट निर्माते होते.