विकृतीचा कळस! पुण्यातील महिला डॉक्टरच्या संसारात कालवलं विष; NUDE होण्यास भाग पाडलं अन्…

पुणे: पुण्यातील एका महिला डॉक्टरसोबत गुजरातमध्यल्या तरुणाने विकृत केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी तरुणाने पीडित महिलेला व्हिडीओ कॉलवर नग्न होण्यास भाग पाडून, संबंधित व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल केले आहेत. आरोपी इतक्यावर न थांबता त्याने पीडित महिलेच्या नवऱ्याला देखील अश्लील व्हिडीओ पाठवून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव प्रणव अरविंद पांचाळ असे आहे.  गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील अटलादरा येथील रहिवासी आहे. याप्रकरणी 36 वर्षीय पीडित महिलेनं वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून ती एक डॉक्टर आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पीडितेची आरोपी प्रणव पांचाळ याच्याशी ओळख झाली होती.

आरोपी पांचाळने पीडित महिलेचा विश्वास संपादन करत तिला लग्नाचं आमिष दाखवलं. तसेच व्हॉट्सअॅपवरून व्हिडीओ कॉल करून तिला कपडे काढण्यास भाग पाडलं आहे. यानंतर आरोपीनं पीडित महिलेचा अश्लील व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये स्क्रिन रेकॉर्ड केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने हा अश्लील व्हिडीओ पीडित महिलेच्या इमेल आयडीवर पाठवला. तसेच तिच्या नवऱ्याला देखील हा व्हिडीओ पाठवून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.

याव्यतिरिक्त नातेवाईकांना व्हिडीओ पाठवून बदनामी करण्याची धमकी आरोपीनं दिल्याचं पीडितेनं आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे. फिर्यादी डॉक्टर महिलेचं सहा महिन्यांपूर्वी लग्न झालं असून, 2 मार्च 2020 ते 8 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत, आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस तांत्रिक माहितीच्या आधारे घटनेचा तपास करत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!