शरद पवारांवर एकेरी टीका करणाऱ्या, चंद्रकांत पाटलांना राष्ट्रवादीकडून ‘नवरत्न तेलाची बाटली’ भेट!

3

पुणे: भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमी टीकेची जुगलबंदी सुरू असते. यात कधी-कधी अतिरेक होतो. चंद्रकांत पाटील  यांच्याकडून असेच झाले. शरद पवारांवर  टीका करताना ते म्हणालेत ‘राज्यात शरद पवारच आम्हाला आव्हान नाही. कारण ५४ आमदाराच्या वर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळ आयुष्य गेल, कधी ६० वर तो गेला नाही.

चंद्रकांत पाटलांनी पवारांचा एकेरी उल्लेख केल्याने राष्ट्रवादीचे नेते संतापलेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पाटलांना उत्तर दिले. राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता संदीप काळे याने पाटीलांना ‘नवरत्न’ तेलाची बाटली पाठवून संदेश दिला ‘आपण कुणाबद्दल बोलतो, आपली तेवढी उंची आहे का? बोलताना जरा डोक शांत ठेवून टीका करत जा, म्हणून हे नवरत्न तेल तुमच डोक शांत करण्यासाठी पाठवत आहे. आणि तरीही तुमच डोक शांत नाही झाल तर, त्याचा इलाज मी स्वखर्चाने करतो.’

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही चंद्रकांत पाटील यांना सुनावले. ‘चंद्रकांत पाटील, आपल जेवढे वय आहे, तेवढी त्यांची कारकीर्द आहे. आपण बोलताना जरा सांभाळून बोलायला हव. मी तुम्हाला हे परत परत सांगते आहे. राजकारणात एकेरी भाषेत बोलू नये.’

 

Get real time updates directly on you device, subscribe now.