‘बिग बॉस मराठी ३’ अभिनेत्री सुरेखा कुडची बिग बॉसच्या घरातून बाहेर

3

मुंबई: गेल्या आठवड्यात मराठी अभिनेता अक्षय वाघमारे हा ‘बिग बॉस मराठी ३’ मधून बाहेर पडला. त्यानंतर कोण बेघर होणार याकडं प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. अखेर घरातून बाहेर पडणारा दुसरा स्पर्धक ठरल्या अभिनेत्री सुरेखा कुडची.

बिग बॉसच्या घरात एक वेगळ्याचं प्रकारची जादू असल्याचं सुरेखा यांनी म्हटलं. त्या खूपच भावुक झाल्या होत्या. ‘घरातून बाहेर जाताना रडणार नाही, असं ठरवलं होतं, पण हे घरं असं आहे की, डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही, घरातील कोणताच स्पर्धक वाईट नाहीए, वेळ आणि परिस्थितीमुळं वागावं लागतं’ असंही सुरेखा यांनी म्हटलं .

कोण आहेत सुरेखा कुडची?

अभिनेत्री सुरेखा कुडची या १९९० पासून अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी सिनेमा, मालिकांतही काम करत लोकप्रियता मिळवली आहे. मराठी सिनेमांमध्ये सासुची माया, पोलिसाची बायको, भरत आला परत, खुर्ची सम्राट, तीन बायका फजिती ऐका, फॉरेनची पाटलीण यांचा समावेश आहे. आता पर्यंत त्यांनी ५० मराठी आणि हिंदी सिनेमांत काम केले आहे.याशिवाय देवयानी, रुंजी, नवरी मिळे नव-याला, चंद्र आहे साक्षीला यासारख्या मालिकांतही त्यांनी काम केले आहे. नुकतेच स्वाभिमान या मालिकेतही त्यांनी काम केले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.