पॅकेजिंग यूनिटला भीषण आग; पाचव्या मजल्यावरून मजुरांनी मारल्या उड्या, दोघांचा मृत्यू

सुरत: सोमवारी सकाळी सुरतमधील GIDC परिसरात एका पॅकेजिंग कंपनीला भीषण आग  लागल्याची माहिती समोर आली आहे. सुरतच्या कडोदरा परिसरातील वरेली येथील एका पॅकेजिंग युनिटमध्ये ही आग लागली भीषण आगीत दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. या आगीतून आता 125 जणांची सुटका करण्यात आली आहे. आग लागल्यानंतर इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून मजुरांनी उड्या मारल्या. त्यात अनेक मजूर जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे.

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न करत असून बचाव दलाने आतापर्यंत 100 हून अधिक कामगारांची सुखरुप सुटका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरतच्या कडोदरा भागातील वरेली येथील पॅकेजिंग युनिटमध्ये नेहमीप्रमाणे काम सुरू होतं. अनेक कामगार कंपनीच्या पाचव्या मजल्यावर काम करत होते. दरम्यान, अचानक पाचव्या मजल्याला आग लागली. ज्वाळा वाढत असल्याचं पाहून कामगार घाबरले. काही मजूर इतके घाबरले की, त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी थेट पाचव्या मजल्यावरून उड्या मारण्यास सुरुवात केली.

पॅकेजिंग युनिटमध्ये आग लागल्याची माहिती मिळल्यानंतर, घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी हायड्रोलिक लिफ्टद्वारे कामगारांची सुटका केली आहे. आतापर्यंत पॅकेजिंग युनिटमधून शंभरहून अधिक लोकांना वाचवण्यात आलं आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत माहिती देताना सूरतचे एसडीएम केजी वाघेला यांनी एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, आग लागल्यानंतर संबंधित कामगाराने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली होती. यातच त्याचा मृत्यू झाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!