केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान: टी-ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार
मुंबई: भारत पाकिस्तान टी-ट्वेंटी स्पर्धेतील सामना (दि.२४) ऑक्टोबरलाआहे. परंतू त्याआधी सामना रद्द करण्यात यावा अशी मागणी होत आहे. तसेच याबाबत केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दोन्ही देशांमधील संबंध चांगले नाहीत. तर मग या विषयावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे, असं गिरिराज सिंह म्हणाले आहेत.
टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा पहिलाच सामना पाकिस्तान विरोधात खेळवण्यात येणार आहे. हा सामना 24 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. पण त्याआधीच हा सामना होऊ नये, अशी मागणी आता देशभरातून होऊ लागली आहे. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये प्रचंड हिंसाचार घडवून आणला जातोय. काश्मीरच्या घाट परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना वारंवाल लक्ष्य केलं जातंय. त्यांच्यावर हल्ला केला जातोय.
गेल्या 10 दिवसांमध्ये भारतीय सैन्याचे अतिरेक्यांसोबत 9 वेळा चकमक झाली. यामध्ये आतापर्यंत 12 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत असलं तरी अतिरेक्यांच्या कारवाया काही कमी होताना दिसत नाहीय. पाकिस्तान पूरस्कृत दहशतवादी वारंवार काश्मीरमध्ये घुसखोरी करुन हिंसाचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये पाकिस्तानच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.