मराठी अभिनेत्रीकडून राज ठाकरेंना न ओळखल्याने चौकीदाराला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

2

मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा फोटो न ओळखल्याबद्दल एका मराठी अभिनेत्रीने चौकीदाराला बेदम मारहाण केली. मुंबईतील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चौकीदाराला मारहाण करणारी महिला मनसे कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. मुंबईच्या मालवणी पोलिसांनी मराठी सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माता आणि त्यांच्या ड्रायव्हरला अटक केली आहे आणि अभिनेत्रीला नोटीस देण्यात आली आहे.

मालाड पश्चिम, मुंबई येथे असलेल्या मालवणी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुंबईच्या मढ भागात जाऊन चौकीदाराला मारहाण करत होते आणि त्याला पैशांची मागणी करत होते. एवढेच नाही तर त्यांनी या मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल केला. यानंतर पीडित चौकीदार दयानंद गौड याने मालवणी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 452,385,323,504, 506,34 अन्वये गुन्हा नोंदवून तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

चारकोप विधानसभेचे मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी याबाबत सांगितले की, चौकीदार नीट वागत नव्हता. वास्तविक मराठी निर्माते, दिग्दर्शक आणि एक मराठी अभिनेत्री शूटिंगसाठी जागा पाहण्यासाठी मढ परिसरातील एका बंगल्यात गेले होते. तेथे असलेल्या चौकीदाराने आतमध्ये शूटिंग चालू आहे असे सांगून त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. यानंतर, मराठी अभिनेत्रीने राज ठाकरेंचा फोटो चौकीदाराला दाखवला आणि ती मनसे कार्यकर्ता असल्याचे सांगितले. चौकीदाराने फोटोमध्ये राज ठाकरे यांना ओळखत नाही. मुंबईत राहून राज ठाकरे यांना ओळखत नाही, असे सांगत अभिनेत्रीने चौकीदाराला मारहाण करण्यास सुरुवात केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.