IAS योगेश पाटील यांच्या एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराला तरुण तरूणीचा वर्गाचा उस्फुर्त प्रतिसाद
पुणे: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना योग्य आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन मिळावे या हेतूने लहु बालवडकर सोशल वेलफेअर यांच्या सयुक्त विधमाने आज बालेवाडी येथील रॉयल रनभूमी मल्टीस्पोर्ट्स टर्फ येथे IAS अधिकारी योगेश पाटील यांच्या एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला 300 हुन अधिक तरुण व त्यांचे पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या वेळेस मा. सतीश पाटील(DY.CEO), लहु बालवडकर सोशल वेलफेअर चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी स्पर्धा परीक्षेत कशा प्रकारे सहभागी व्हावे, त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करावा याचे अचूक आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. “IAS योगेश पाटील यांनी केलेले मार्गदर्शन आमच्या सारख्या उपस्थित मुलामुलींना भावी आयुष्यासाठी नक्कीच फायद्याचे आणि दिशादर्शक ठरेल यात शंका नाही” अशी भावना या वेळी उपस्थित काही तरुणांनी व्यक्त केली.