लेक वाचवा अभियानाच्या जयश्री गाडे यांचा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते सत्कार

पुणे: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लेक वाचवा अभियानाच्या जयश्री गाडे यांनी १ नोव्हेबंर रोजी पुणे येथे सत्कार करण्यात आला आहे.
कविताताई आल्हाट यांनी कर्तुत्ववान महीलांचा सन्मान कार्यक्रम आयोजीत केला होता. यावेळी खासदार अमोल कोल्हे व सौ.रुपालीताई चाकणकरांच्या हस्ते विविध श्रेत्रातील महीलांचा सन्मान करण्यात आला. सौ.जयश्री गाडे,चिखली यांचे गेल्या ६ वर्षातील समाजकार्याचा येथे मान्यवरांनी गौरव केला.
4 फेब्रुवारी 2020 रोजी विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा पासून हे पद रिक्त होतं. राज्यात गेल्या काही दिवसांत महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशावेळी अखेर ठाकरे सरकारनं रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड केली आहे.