बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा ‘आर्या-2’मधील फर्स्ट लूक रिलीज

मुंबई: माजी विश्वसुंदरी आणि बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने दीर्घ काळानंतर “आर्या’ या वेब सिरीजच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले होते. या वेब सिरीजला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच 2020 मधील टॉप वेब सिरीजमध्येही तिला स्थान मिळाले होते.
“आर्या’ला मिळालेल्या यशानंतर निर्मात्यांनी त्याच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. आता “आर्या-2’मधील सुष्मिता सेनचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या वेब सिरीजचा टीझर सुष्मिता सेनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर लवकरच सुरू होणाऱ्या दुसऱ्या सत्रात सुष्मिता सेन ही आर्या सरीनच्या भूमिकेत दिसणार आहे. यात ती तिच्या सर्वात धोकादायक शत्रूंशी लढताना दिसणार आहे. या ऍक्शन ड्रामा सिरीजमध्ये आर्याच्या काळ्या जगाचे रहस्य उलगडणार आहे.
या बहुप्रतिक्षित सिक्वेलच्या टीझरची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. हा टीझर एक प्रभावी आणि वेधक कथानक सादर करत असून जिथे आर्या तिच्या पतीच्या हत्येचा बदला घेते. टीझरमध्ये सुष्मिता सेन पांढऱ्या रंगाची साडी परिधान करताना दिसत आहे.
कधीच हार न मानणे
१९९४ साली सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचे बिरूद मिळवले आणि रातोरात ती जगभर पोहोचली पण तुम्हाला माहित आहे का त्याच्या आदल्या वर्षी ती ऐश्वर्या रायकडून मिस इंडियाची स्पर्धा हरली होती. सुष्मिता सेनच्या जागी दुसरी कोणी असती तर तो धक्का पचवायला तिने वेळ घेतला असता वा पुन्हा ऐश्वर्या कडून आपण हरू हा विचार करून माघार घेतली असती. पण सुष्मिता सेन पुन्हा जिद्दीने उभी राहिली आणि तिने मिस युनिवर्स बनून दाखवले. निवड प्रक्रिये नंतर सुष्मिता सेनचा पासपोर्ट हरवला होता. तो मिळत नव्हता म्हणून तिच्या जागी ऐश्वर्याला मिस युनिवर्स स्पर्धेत पाठवण्याची तयारी सुरु झाली. पण सुष्मिता सेनने आपला पासपोर्ट मिळवला आणि आपली मेहनत सफल करून दाखवली.