बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज चौहान’ चित्रपटाचा टीझर रिलीज, अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चांगले यश मिळाले. सगळीकडेच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु असताना अक्षयच्या दुसऱ्या बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर या टीझरला तुफान पसंती मिळत आहे.

‘पृथ्वीराज’ हा चित्रपट महान भारतीय सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमार पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर अभिनेत्री मानुषी छिल्लर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती पृथ्वीराज चौहान यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री मानुषी छिल्लर या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

या चित्रपटामध्ये ती पृथ्वीराज चौहान यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. याबरोबरच सिनेमात संजय दत्त, सोनू सूद आणि आशुतोष राणा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. सिनेमाच्या टीझरवरून या सिनेमाची भव्यता आपल्या लक्षात येणार आहे. टीझरमधील युद्धभूमीवर सज्ज असलेले योद्धे, पेटलेले रणांगण आणि दमदार डायलॉग प्रेक्षकाचे लक्ष वेधून घेणार आहेत. चंद्र प्रकाश द्विवेदी यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.