अभिनेत्री प्रीती झिंटा झाली जुळ्या मुलांची आई

मुंबई: अभिनेत्री प्रिती झिंटाने दोन मुलांना सरोगसीच्या माध्यमातून जन्म दिला आहे. ही दोन्ही जुळी मुलं आहेत. एक पोस्ट शेअर करत प्रिती झिंटाने याबाबतची माहिती दिली आहे. प्रिती झिंटा आणि तिचा पती जीन गुडइनफ यांच्या घरात या दोन चिमुकल्यांचं आगमन झालं आहे.

‘मला आज तुम्हाला अत्यंत आनंदाची बातमी सांगायची आहे. जीन आणि मी खूप आनंदी आहोत. आमची मनं कृतज्ञतेने आणि प्रेमाने भरली आहेत. कारण आम्ही आमच्या जुळ्या मुलांचं कुटुंबात स्वागत केलं आहे’ जय आणि जिया अशी या दोन मुलांची नावं आहेत. सरोगसीच्या माध्यमातून या दोन मुलांचा जन्म झाला आहे. आमच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाबद्दल आम्ही दोघं खूप उत्सुक आणि आनंदी आहोत. या अविश्वसनीय प्रवासात आमची साथ देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि आमच्या सरोगेटचे मनःपूर्वक आभार असंही प्रितीने म्हटलं आहे.

प्रिती झिंटाने तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान जीन गुडइनफसोबत गुपचूप लग्न केले. फेब्रुवारी 2016 मध्या लॉस एंजल्समध्ये अगदी खासगी सोहळा करत तिने हे लग्न केलं. प्रिती आणि जीनने अतिशय गुपचूप लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो जवळपास सहा महिन्यांनी मीडिया समोर आले होते. आता लग्नाच्या जवळपास पाच वर्षांनंतर प्रिती आई झाली आहे. तिला आता जुळी मुलं झाली आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!