पुणे महापालिकेचे 65 लाखांचे नुकसान, अन्नपदार्थ तपासणी प्रयोगशाळा धूळखात पडून

पुणे: पुणे महापालिकेने तब्बल साडे अकरा कोटी रुपये खर्च करून कोंढवा येथे अन्न व अन्न पदार्थ्यांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा उभारली. ही संस्था भाड्याने देऊन त्यातून दर महिन्याला अडीच लाख रुपये उत्पन्न मिळणार होते. मात्र, गेल्या २६ महिन्यापासून हा प्रस्ताव मुख्यसभेपुढे प्रलंबित असून असून, पालिकेचे 65 लाखांचे नुकसान झाले आहे.

पुणे महापालिकेने 2011 मध्ये कोंढवा येथे काही कोटी रुपये खर्च करून एक प्रयोगशाळा उभारली असून, तेथे अन्न व अन्नपदार्थांची तपासणी करण्याचे काम ही प्रयोगशाळा करते. 2014 मध्ये सात कोटी 70 लाख रुपयांची अत्याधुनिक उपकरणेही तेथे घेण्यात आली.2013 मध्ये ही प्रयोगशाळा महापालिकेला चालविणे शक्य नाही, या नावाखाली ती चालविण्याकरिता ‘फुडी हायजेनी अॅण्ड हेल्थ लॅब’ या संस्थेशी पाच वर्षांचा करारनामा करण्यात आला.

या पाच वर्षांच्या करारादरम्यान पुणे पालिकेने प्रयोगशाळा चालविण्यापोटी या संस्थेस करारनाम्याप्रमाणे तीन कोटी 56 लाख रुपये दिले. याशिवाय या ठिकाणचे वीज बिल, तसेच प्रयोगशाळेसाठी लागणारी केमिकल्स व इतर गोष्टी यापोटी पालिकेने किमान 60 लाख रुपये खर्च केले. पालिकेला प्रत्यक्षात पाच वर्षांत मिळून 12.78 लाख रुपये उत्पन्न मिळाले.

तीन वर्षांपूर्वी प्रयोगशाळा भाड्याने देऊन वर्षाला 30 लाख रुपये उत्पन्न महापालिकेला मिळवून देणारा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत सप्टेंबर 2019 मध्ये मंजूर करून करण्यात आला. मात्र, पालिकेला उत्पन्न मिळवून देणारा हा प्रस्ताव अद्यापि सर्वसाधारण सभेच्या संमतीसाठी प्रलंबित आहे, ज्यामुळे महापालिकेचे 26 महिन्यांत 65 लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे, असे सजग नागरिक मंच’ चे विवेक वेलणकर यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!