देवेंद्र फडणवीस ज्यांच्या पाठीशी त्याचे कोण वाकडे करू शकत नाही – गोपीचंद पडळकर

3

पिंपरी: भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे सच्चा माणूस आहे. गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा अशी या माणसाची राज्यभरात ओळख आहे. या सच्च्या माणसावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विशेष जीव आहे. त्यामुळे राज्यात सत्ता नसली, तरी फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व ज्यांच्या पाठीशी आहे, त्यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही, अशी तुफान फटाकेबाजी विधान परीषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.चिखली येथे ‘फ’ प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड यांनी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त “चला-हवा-येऊ-द्या” कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानिमित्त आमदार पडळकर उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

माजी महापौर राहुल जाधव, नगरसेविका साधना मुळेकर, स्वीनल म्हेत्रे, विकास डोळस, भाजप सरचिटणीस राजू दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार, अंकुश मळेकर, टायगर ग्रुपचे तानाजी जाधव,अनिकेत घुले उपस्थित होते.

पडळकर म्हणाले की, महेश लांडगे अतिशय भला माणूस आहे. ते मनाने निर्मळ आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा चांगल्या मनाच्या माणसाशी कायम एकनिष्ठ रहायला हवे. जे गोरगरीब आहेत. ज्यांची समाजात प्रतारणा होते. अशा माणसाच्या पाठीशी महेशदादा यांचे नेतृत्व कायम उभे असते. अशी त्यांची राज्यभरात ख्याती आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात समाविष्ट असणाऱ्या उपनगर समजल्या जाणाऱ्या चिखली सारख्या भागाचा कायापालट आपल्याला गेल्या चार वर्षांत दिसून आला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आम्ही कुठलेही पद देताना शहराबाहेर जाऊन निर्णय घेत नाही. असे म्हणत आमदार महेश लांडगे यांनी विरोधकांना टोला लगावला. शहरातच, स्थानिक पातळीवर सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतो. त्यामुळे महत्त्वाची पदे देखील त्याच ताकदीच्या माणसाला मिळतात आणि म्हणूनच शहराचा प्रभागाचा आणि स्थानिक भागांचा विकास झालेला दिसून येत आहे, असे आमदार महेश लांडगे यावेळी म्हणाले.

नगरसेवक कुंदन गायकवाड म्हणाले की , चिखलीसारख्या उपनगरीय भागांचे नेतृत्व करण्यासाठी महेश लांडगे यांनी संधी दिली. आम्ही त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करत आहोत. या चार वर्षाच्या काळात महेश लांडगे यांनी सर्वतोपरी पाठिंबा दिला. आम्ही नवखे आहे, म्हणून कधीही हेटाळणी केली नाही. पदोपदी समजून घेण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाची पदे देखील दिली. उपनगर, ग्रामीण भाग असलेल्या समाविष्ट भागाला पहिले महापौर पद देण्याचा मानही आमदार लांडगे यांच्या मुळे मिळाला. त्यांनी नागरिकांच्या या भागाच्या गरजा ओळखल्या. त्यामुळेच आम्ही या प्रभागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करू शकलो अशा भावना गायकवाड यांनी व्यक्त केल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.