लोकल प्रवाशांना सर्वात मोठा दिलासा! बुधवारपासून मोबाइल तिकिटींग अ‍ॅप युटीएस सुरू

5

मुंबई: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासाजनक बातमी आहे. कारण यूटीएस मोबाईल अ‍ॅपला आता युनिव्हर्सल पास लिंकिंग करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना कोणत्याही त्रासाशिवाय यूटीएस मोबाईल अ‍ॅपवरून  तिकिट मिळणार आहे. लोकलने प्रवास करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला लसीचे दोन्ही डोस मिळालेले असतील आणि शेवटच्या डोसनंतर १४ दिवसांचा कालावधी झाला असेल अशांना राज्य सरकारच्या पोर्टलद्वारे लसीकरण स्थितीची योग्य पडताळणी केल्यानंतर युनिव्हर्सल पास मिळणार आहे.

तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवाशांना तिकीट काउंटरवर युनिव्हर्सल पास दाखवावा लागेल. आता युनिव्हर्सल पास जारी करणारे राज्य सरकारचे पोर्टल रेल्वेच्या यूटीएस मोबाइल ॲपशी जोडले गेले आहे. त्यामुळे वर नमूद केलेल्या श्रेणीतील प्रवासी काउंटरवर न जाता तिकीट खरेदी करु शकणार आहेत.

या अ‍ॅपद्वारे प्रवाशांना तिकीट आणि मासिक तिकीट दोन्ही खरेदी करता येणार आहे. तर मासिक तिकिटांचे नूतनीकरण देखील शक्य आहे. यामुळे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना काउंटरवर जाण्याची गरज नाही. ही सुविधा २४ नोव्हेंबर २०२१ पासून अँड्रॉइड गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध होईल.

Get real time updates directly on you device, subscribe now.