ट्विटरच्या सीईओपदी पराग अग्रवाल यांची नियुक्ती; कोण आहेत पराग अग्रवाल?
मुंबई: ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पराग अग्रवाल हे ट्विटरचे नवे सीईओ असणार आहेत. पराग अग्रवाल हे या जागी बसतील. जॅक डॉर्सी हे त्यांचा उतराधिकारी पराग यांना जबाबदारी देतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षापासूनच जॅक डॉर्सी यांनी हे जाहीर केलं होतं की मी लवकरच कंपनी सोडणार आहे. आपल्या पदाचा मी राजीनामा देणार आहे. त्यासंबंधीची प्रक्रिया गेल्या वर्षी पासून सुरू होती.
ट्विटरने एक पत्र जारी केलं आहे. त्यामध्ये डॉर्सी यांनी म्हटलं आहे की त्यांनी कंपनीत मी अनेक पदांवर जबाबदाऱ्या निभावल्या आहेत. मी आधी को-फाऊंडर म्हणजे सह संस्थापक म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यानंतर चेअरमनही राहिलो आहे. एक्झिक्युटिव्ह चेअरमन आणि शेवटी सीईओ पद अशा जबाबदाऱ्या निभावल्या आहेत. सीईओ म्हणून 16 वर्षे काम केलं आहे. मात्र आता मी हा निर्णय घेतला आहे की आपण थांबायचं. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. माझा उत्तराधिकारी म्हणून मी पराग अग्रवाल यांना निवडलं आहे ते आता नवे सीईओ असतील असं डॉर्सी यांनी म्हटलं आहे.
जॅक डॉर्सी यांनी आपलं पद सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांनी एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं होतं की मी ट्विटर सोडणार आहे. ही कंपनी संस्थापकांच्याही पुढे गेली आहे असं मला वाटत असल्याने मी हा निर्णय घेतला आहे असं त्यांनी म्हटलं होतं. पराग अग्रवाल हे सीईओ म्हणून उत्तम काम करतील असा माझा विश्वास आहे. गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेली कामगिरी उत्तम आहे त्यामुळे सीईओ म्हणून मी त्यांची निवड केली आहे असंही डॉर्सी यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत पराग अग्रवाल?
पराग अग्रवाल हे आतापर्यंत ट्विटरचे चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर (CTO) म्हणजेच मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम पाहात होते आणि संपूर्ण तांत्रिक जबाबदारी सांभाळत होते. पराग अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये इंजिनिअर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. आता ते सीईओ पदाची सूत्रे हाती घेणार आहेत, अशी माहिती डॉर्सी यांनी दिलीये.
पराग अग्रवाल यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये डॉक्टरेट पदवी घेतली आहे. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. तसेच, त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडीही केली आहे.