सीडीएस बिपीन रावत यांच्या पार्थिवावर शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार
मुंबई: तामिळनाडूतील कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावणारे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांचे पार्थिव आज (गुरुवारी) दिल्लीत आणले जाईल. यानंतर शुक्रवारी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये दोघांवर अंतिम अंत्यसंस्कार केले जातील.
शुक्रवारी जनरल बिपीन रावत यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवले जाईल. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान त्यांच्या पार्थिवाला सलामी दिली जाईल. दिल्लीच्या कॅन्टोन्मेंटमधीस ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडेल. रावत यांच्या निधनानंतर गृहराज्य उत्तराखंडमध्ये राज्य सरकारने तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी यांचे पार्थिव गुरुवारी संध्याकाळपर्यंत लष्करी विमानाने राजधानी दिल्लीत पोहोचेल.
बिपीन रावत आणि मधुलिका रावत यांच्या पश्चात दोन मुली आहे. एका मुलीचे नाव कीर्तिका आणि दुसरीचे तारिणी. जनरल रावत यांच्या कीर्तिका या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून ती मुंबई राहते. तर छोटी मुलगी तारिणी दिल्ली राहत असून ती दिल्ली हायकोर्टात प्रॅक्टिस करतेय.
बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सीडीएस बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर उत्तरप्रदेशात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले, सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले. त्यांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना.