पंकजा मुंडेंचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; 12 डिसेंबरला पंकजा मुंडे काय करणार संकल्प?

बीड: भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर एक संकल्प करण्याचा मनोदय जाहीर केला आहे. यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र देखील लिहिले आहे. गोपीनाथ मुंडे यांची 12 डिसेंबरला जयंती आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंकजा यांनी कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिले आहे.

12 डिसेंबर, 3 जून आणि दसरा हे दिवस आपण विसरू शकत नाही. या तिन्ही दिवशी कोणत्याही निमंत्रणाशिवाय तुम्ही गडावर येत असता, आमच्यावर अलोट प्रेम करता हे विसरता येणार नाही असे पंकजा मुंडे यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे. तसेच 12 डिसेंबरला आपण एक संकल्प करणार आहोत, तो संकल्प तुम्ही पूर्ण करणार का? असा सवालही पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केला आहे. त्यांनी आपले हे पत्र ट्विट देखील केले आहे.

काय म्हटले आहे पत्रात?

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची 12 डिसेंबरला जयंती आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर माजीमंत्री तथा भाजपच्या सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना एक पत्र लिहीले आहे. 12 डिसेंबर, 3 जून आणि दसरा हे दिवस आपण विसरू शकत नाही. या तिन्ही दिवशी कोणत्याही निमंत्रणाशिवाय तुम्ही गडावर येत असता, आमच्यावर अलोट प्रेम करता हे विसरता येणार नाही. गोपीनाथ गडावर आतापर्यंत अनेक जण येवून गेले, अनेक दुःखी कुटुंबांना गोपीनाथ गडावरून मदत करता आली त्या सर्वांचे आशीर्वाद मिळाले, हे आशीर्वाद चुकीच्या गोष्टी सुधारण्यासाठी असतील, हे आशीर्वाद धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी असतील असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

त्याच वेळी 12 डिसेंबरला एक संकल्प करण्याचा मनोदय देखील त्यांनी व्यक्त केला आहे. हा संकल्प पूर्ण करणार का असा सवाल त्यांनी या पत्रातून आपल्या कार्यकर्त्यांना विचारला आहे. मात्र हा संकल्प नेमका काय असणार हे या पत्रात स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्या या नव्या संकल्पाबाबत कार्यकर्त्यांसह सर्वांनाच उत्सुकता  आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!