नेटफ्लिक्सच्या सर्व प्लॅनच्या किंमती कमी, आता दरमहा फक्त 149 रुपयांत सबस्क्रिप्शन

मुंबई: नेटफ्लिक्स वापरकर्त्यांसाठी चांगली बातमी आहे. कंपनीने अधिकृतपणे आपल्या सर्व सबस्क्रिप्शन प्लॅनच्या किमती भारतात स्वस्त केल्या आहेत.आता युजर्सना नेटफ्लिक्सवर अगदी कमी खर्चात मनोरंजनाचा आनंद घेता येणार आहे. कमी झालेल्या किमती आजपासून म्हणजेच 14 डिसेंबरपासून लागू करण्यात आल्या आहेत.

तुम्हालाही स्वस्तात नेटफ्लिक्सचा आनंद घ्यायचा असेल तर आता तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. नेटफ्लिक्स चा सर्वात स्वस्त प्लॅन आता फक्त 149 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. त्याची किंमत आधी 199 रुपये होती. दरम्यान, अलीकडेच ऑमेझोन प्राईमने आपल्या सबस्क्रिप्शन प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे नेटफ्लिक्स ची किंमत कपात हे यूजर्ससाठी एक मोठं गिफ्ट मानलं जात आहे. चला जाणून घेऊया नेटफ्लिक्स प्लॅनच्या किमती.

नेटफ्लिक्स ने प्लॅन्सच्या किंमतीत जवळपास 60 टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे यूजर्स आता अतिशय कमी किमतीत प्लान खरेदी करू शकणार आहे. जर तुम्ही नेटफ्लिक्स चा मोबाईल प्लान विकत घेणार तर त्यासाठी तुम्हाला 149 रुपये मोजावे लागतील, जो आतापर्यंत 199 रुपयांना मिळत होता. कंपनीच्या बेसिक प्लानची किंमत 499 रुपये आहे पण आता त्याची किंमत 199 रुपये करण्यात आली आहे.