मोठी बातमी: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला ईडीची नोटीस

1

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला ईडी ने समन्स पाठवले आहेत. पनामा पेपर्स लीक’ प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असून यामुळे बच्चन कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यापूर्वी ऐश्वर्या रायला दोन वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, परंतु दोन्ही वेळेला चौकशी पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

ऐश्वर्याला दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आल्याचे सूत्रांकडून समजतआहे. बच्चन कुटुंबावर 4 सेल कंपन्या स्थापन केल्याचा आरोप आहे. ईडीने यापूर्वी ऐश्वर्याचा पती अभिषेक बच्चन याचा जबाब नोंदवला होता. तसेच पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर विदेशात चार सेल कंपन्या स्थापन केल्याचा आरोप आहे. या सर्व शिपिंग कंपन्या होत्या.

पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाचे नावही समोर आले होते. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने  या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता. अंमलबजावणी संचालनालयाचे एचआययू या प्रकरणाची चौकशी करत आहे. पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे 500 लोकांचा समावेश होता. यामध्ये देशातील नेते, चित्रपट अभिनेते, खेळाडू, उद्योगपती, प्रत्येक वर्गातील नामवंत व्यक्तींची नावे आहेत. या सर्व लोकांवर करचुकवेगिरीचा आरोप आहे. ज्याच्या मदतीने एजन्सी आता आपले काम करत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.