दादरमधील पॅथोलॉजी लॅबमध्ये शिरला कोरोना, 12 कर्मचाऱ्यांना लागण

मुंबई: कोरोना विषाणू संसर्ग पुन्हा वाढू लागल्याचं दिसून येत आहे. मुंबई 24 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजेपर्यंत आलेल्या माहितीनुसार 683 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, दादर येथील लाल पॅथ लॅबमधील 12 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेमुळं खळबळ उडाली असून महापालिकेच्यावतीनं पॅथॉलॉजी लॅब सील करण्यात आली आहे.

लॅबमध्ये काम करणाऱ्या नारायण विजय राणे यांना कोविडची लागण झाली होती. महापालिकेच्या तपासणीत या लॅबमध्ये काम करणाऱ्या 12 कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर दादर पश्चिमेला असलेली लाला पॅथ लॅब महापालिकेने सील केली आहे.

लॅबमध्ये काम करणाऱ्या नारायण विजय राणे यांना कोविडची लागण झाली होती. त्यानंतर महापालिकेने त्याच्या संपर्कात आलेल्या 39 जणांचा शोध सुरू केला आणि महापालिका लॅब पर्यंत पोहोचली. लॅब मधील कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता 19 पैकी 12 जण कोविड बाधित असल्याचे आढळून आले आहेत.

कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. शुक्रवारी मुंबईथ 683 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 267 कोरोना रुग्णांना बरं झाल्यावर डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत एकूण 7 लाख 47 हजार 258 कोरोना रुग्ण बर झाले आहेत. मुंबईत सध्या 3227 सक्रिय रुग्ण आहेत.