राज्यपालांचा शिवसेनेला झटका; मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत 1 हजार 844 कोटींचा घोटाळा

6

मुंबई: विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातला लेटर वॉर अख्ख्या राज्याचे पाहिला. हे प्रकरण ताजेच असताना आता राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आणखी एक झटका दिला आहे. मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांनी लोकायुक्तांना दिले आहेत.

मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत 1 हजार 844 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटेचा आणि काही नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे राज्यपालांनी आश्रय योजनेतील झालेला गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश लोकायुक्तांना दिले आहेत.

सफाई कामगारांसाठी आश्रय योजनेतून पक्की घरे बांधली जातात. या योजनेच्या माध्यमातून सफाई कामगारांच्या 39 वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या योजनते आतापर्यंत मुंबई महापालिकेने 1 हजार 844 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रस्तावावर भाजपने आक्षेप नोंदवला होता. मात्र त्यानंतरही प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजपचे स्थायी समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राज्यपालांनी या प्रकरणात लोकायुक्तांना चौकशी करण्याची सूचना केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.