पुणे जिल्हा बँक निवडणूकीत राष्ट्रवादीच पुन्हा; एका जागेवर मात्र पराभव
पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सात जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पर पडली होती. या सात जागांचे निकाल आता आले आहेत. जिल्हा बँकेवर यापूर्वीचा 21 पैकी 14 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 7 जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. आज सकाळी अल्पबचत भवन येथे मतमोजणी झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवत वर्चस्व मिळवलं आहे.
अजित पवारांची राजकीय कारर्कीद याच जिल्हा बँक निवडणुकीपासून सुरु झाली होती. पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. १९९१ पासून अजित पवारांनी जिल्हा बॅंकेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे ही निवडणूक अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणुकीत सत्ता राष्ट्रवादीने मिळवली असली तरी एक भाजप उमेदवाराने विजय मिळवल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीची मतमोजणी आज झाली. यावेळी सात पैकी तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेत. त्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा बँकेवर आपली सत्ता काबीज केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील चांदेरे, आमदार अशोक पवार, विकास दांगट अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची नावे आहेत तर बिनविरोध निवडून आलेल्या १४ संचालकांपैकी १३ संचालक हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आहेत. दरम्यान, या निवडणुकीत भाजप पाठिंबा्याने एक सदस्य निवडून आला आहे. बँक पतसंस्थांच्या गटामधून भाजप पुरस्कृत प्रदीप कंद ११ मतांनी विजयी झाले आहेत.