स्मशानात चितेवर भाजलेली भाकरी ते पद्मश्री; सिंधूताईंचा थक्क करणारा प्रवास
पुणे: सामाजिक कार्यकर्त्यां आणि ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. सामाजिक कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताईंचा आयुष्याचा प्रवास खूपच थक्क करुन सोडणारा होता.
नवऱ्यानं टाकल्यावर गुरांच्या गोठ्यात दिला होता मुलीला जन्म- 14 नोव्हेंबर 1947 मध्ये जन्मलेल्या सिंधुताईंचे वयाच्या 10 व्या वर्षीच 20 वर्षांच्या व्यक्तीशी लग्न झाले. गर्भवती असताना नवऱ्याने त्यांना घरातून बाहेर काढले. गाईंच्या गोठ्यात त्यांनी आपल्या मुलीला जन्म दिला. त्यांनी स्वत: आपल्या हाताने नाळ कापली होती. आत्महत्येचाही विचार मनात घोंगावला, पण- लेकीला जन्म दिल्यानंतर सिंधूताईंच्या मनात आत्महत्या करुन जीवन संपवण्याचा विचारही आला होता. पण त्यां संघर्ष करायचे ठरवंल आणि समाजासाठी स्वत:ला झोकून देण्याचं ठरवलं.
चितेवर ठेवलेलं पीठ अन् त्यावरच भाजली होती भाकर- सिंधूताईंनी आपले संपर्ण आयुष्य अनाथ मुलांसाठी खर्च केले. 1500 पेक्षा अधिक अनाथ मुलांच्या आई अशी त्यांची ओळख आहे. अनाथांच्या माईच्या आयुष्यातील प्रवास हा खूप संघर्षमयी होता. नवऱ्याने घरातून बाहेर काढल्यानंतर त्यांनी खूप वाईट अनुभव घेतले. एका मुलाखतीमध्ये त्यांनी चितेवर ठेवलेल्या पीठ मळून चक्क चितेवर भाकरी भाजून खाल्ल्याचा किस्सा सांगितला होता.
अनाथ लेकरांची आई होण्यासाठी पोटच्या गोळ्याला ठेवलं दूर- लेकीच्या प्रेमापाटी अनाथ मुलांना सांभाळण्याचा वसा बाजूला पडू नये यासाठी सिंधूताई सपकाळ यांनी आपल्या पोटच्या गोळ्याला दूर ठेवण्याचा धाडसी आणि मोठा निर्णय घेतला होता. एका मुलाखतीमध्ये त्यांनी स्वत: यासंदर्भातील माहिती सांगितली होती. ज्यानं घराबाहेर काढल त्या नवऱ्याला स्विकारलं- आपल्याला घराबाहेर काढणाऱ्या नवऱ्याचाही त्या आधार झाल्या. ज्यावेळी सिंधूताई समाज कार्यात व्यस्त होत्या तेव्हा त्यांचा नवरा त्यांना भेटला. “बाबा तूला सांभाळीनं पण नवरा म्हणून नाही तर लेकुरवाळ्याच्या नात्यानं” हे शब्द सिंधूताईंच्या तोंडून ऐकताना वात्सल्य काय असते याची अनुभूती मिळायची.