ठाकरे सरकारकडून आता मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावे! जाणूण घ्या कोणत्या मंत्र्यांच्या बंगल्याला काय नाव दिले?

मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या बंगल्याची नावे बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता मंत्र्यांच्या बंगल्याची नावे ही गडकिल्ल्यांच्या नावाने यापुढे ओळखण्यात येतील. राज्याच्या सार्वजनिक आणि बांधकाम विभागाने काढलेल्या एका परिपत्रकानुसार आता मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांच्या नावांना गडकिल्ल्यांची नावे देण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या २० कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या बंगल्यांना आता गडकिल्ल्यांचे नाव देणारा आदेश जारी करण्यात आला आहे.

कोणत्या मंत्र्यांच्या बंगल्याला कोणतं नाव?

अ 3 – शिवगड – जितेंद्र आव्हाड,

अ 4 – राजगड – दादा भुसे,

अ 5 – प्रतापगड -के.सी. पाडवी,

अ 6 – रायगड – आदित्य ठाकरे

अ 9 – लोहगड –

बी 1 – सिंहगड – विजय वड्डेटीवार

बी 2 – रत्नसिंधू – उदय सामंत

बी 3 – जंजिरा – अमित देशमुख

बी 4 – पावनगड – वर्षा गायकवाड

बी 5 – विजयदुर्ग – हसन मुश्रीफ

बी 6 – सिद्धगड – यशोमती ठाकूर

बी 7 – पन्हाळगड – सुनील केदार

क 1 – सुवर्णगड – गुलाबराव पाटील

क 2 – ब्रह्मगिरी – संदीपान भुमरे

क 3 – पुरंदर

क 4 – शिवालय

क 5 – अजिंक्यतारा – अनिल परब

क 6 – प्रचितगड – बाळासाहेब पाटील

क 7 – जयगड

क 8 – विशाळगड

राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याचे बदलेले नाव आता शिवगड असणार आहे. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या बंगल्याचे नाव रायगड असेल. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्याचे नाव सिंहगड आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या बंगल्याचे नाव रत्नसिंधू असेल. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्याचे नाव पावनगड तर महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या बंगल्याचे नाव सिद्धगड असेल. तर कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या बंगल्याचे नाव हे राजगड असेल.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाला गड किल्ल्यांची नावे देण्याची मागणी केली होती. ही मागणी राज्य सरकारपुढे विचाराधीन होती. त्यानुसार सार्वजनिक आणि बांधकाम विभागाला मंत्र्यांच्या आणि राज्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना गड किल्ल्यांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतचे पत्रकही जारी करण्यात आले आहे.