‘जय भीम’ने केला विक्रम, ऑस्करच्या यूट्यूबवर दिसणारा पहिला भारतीय सिनेमा

मुंबई: साउथ सुपरस्टार सूर्याचा जय भीम हा दाक्षिणात्य सिनेमा रिलीज झाल्यापासून सिनेमा विषय, कहाणी आणि कलाकारांच्या जबरदस्त अभिनयामुळे चर्चेत आहे. प्रेक्षकांनी देखील सिनेमाचे कौतुक केले. जय भीम हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जय भीम या सिनेमाने पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड तयार करत भारतीय सिनेमाचे नाव उंचावले आहे. जय भीम सिनेमा ऑस्करच्या यूट्यूब चॅनेलवर दाखवला जाणार आहेत. ऑस्करच्या यूट्यूबवर दिसणारा जय भीम हा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे, सिनेमा ऑस्करच्या अँकडमीक अवॉर्डच्या यूट्यूब चॅनलवर दाखवला जाणार आहे.

4 नोव्हेंबर 2021 ला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आले. सिनेमाचे एकूण बजेट 10 कोटींहून अधिक होते. मात्र सिनेमाने बजेटहून अधिक रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड तयार केला. काही दिवसांपूर्वी IMDB ने जाहीर केलेल्या 2021मधील सर्वोत्तम लोकप्रिय सिनेमांच्या यादीत जय भीम या सिनेमाचा पहिला क्रमांक होता. 9.6 रेटींग सिनेमाला मिळाले होते. देशातील अनेक महत्त्वाचे आणि मानाने पुरस्कारही सिनेमाने आपल्या नावे केले. त्याचप्रमाणे सिनेमाने गोल्डन ग्लोब्स2022च्या बेस्ट नॉन इंग्लिश फिल्म कॅटेगरीमध्ये ऑफिशियल एंट्री मिळवली आहे.

जय भीम सिनेमात अभिनेता सूर्याने वकील चंद्रू आणि लिजोमोल जोसने सेनगानी या व्यक्तीरेखा साकारल्या होत्या. त्याचप्रमाणे मणिकंदन, राजीशा विजयन, प्रकाश राज आणि राव रमेश यांसारख्या कलाकारांनीही सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 1993मध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारीत हा सिनेमा असून अन्यायग्रस्त कुटुंब आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या वकीलाच्या संघर्षाची कहाणी सिनेमात दाखवण्यात आली आहे.