भिजवलेले बदाम खाल्याने शरीरासाठी नेमका काय फायदा होतो; जाणून घ्या!

112

मुंबई: सुका मेवा हा तेलकट आणि चरबी वाढवणारा असल्याचं मानलं जातं. पण काजू सोडल्यास अन्य कुठल्याही सुक्या मेव्याने चरबी वाढत नाही. सुक्या मेव्यामधील बदामात सर्वात कमी चरबी असते. बदामामध्ये अनेक प्रकारची प्रथिनं असतात. त्यामुळे डाएटमध्ये देखील डॉक्टर बदाम खाण्याचा सल्ला देतात. कोरडे बदाम खाणं देखील शरीरासाठी फायदेशीर आहे. पण भिजवलेले बदाम सकाळी खाल्ले, तर त्यात जास्त औषधी गुणधर्म तयार होतात. त्यामुळे रोज सकाळी पाण्यात भिजवलेले बदाम खावेत.

भिजवलेले बदाम का खावेत

भिजवलेले बदाम पचनशक्ती सुधारण्यास मदत करते

‘जर्नल ऑफ फूड सायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार कच्चे व भिजवलेले बदाम पाण्यात भिजवल्याने पचन सुधारते. कारण भिजवलेल्या  बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्जाईम्स शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते.

रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवते

रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम फारच फायदेशीर आहे. ‘जर्नल ऑफ फ्री रॅडीकल रिसर्च’ यांच्यानुसार बदामातील  ‘अल्फा टेकोफेरॉल्स’ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते. असे देखील या संशोधनातून पुढे आले आहे. विशेषतः 30 -70वयोगटातील पुरूंषांमध्ये  हा फरक प्रामुख्याने आढळून आला.

हृद्याचे कार्य सुधारते

जर्नल ऑफ न्युट्रीशनच्या अहवालानुआर बदामातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृद्यावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृद्यविकारांपासूनही बचाव होतो. त्यामुळे आहारात बदामांचा समावेश अवश्य करावा.

वजन कमी होते

भिजवलेले बदाम वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. यामध्ये असलेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅट तुमची भूक कमी करण्यास आणि पोट भरलेले राहण्यास मदत करतात. तसेच भिजवलेले बदाम देखील अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.