आज आहे सर्वपित्री अमावस्या श्राद्धकार्य कसे करावे? जाणून घ्या विधी

16

मुंबई: हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्येला पितरांचे स्मरण करण्याची प्रथा आहे. पितृपंधरवड्यामध्ये या ‘सर्वपित्री अमावस्या’ या दिवशी हे विशेष पाळले जाते. कारण या पंधरा दिवसांच्या काळात यमलोकांतून मृत्यूलोकी जाण्यासाठी पितरांना परवानगी असते. त्यांना पिंडदानाच्या माध्यमातून आपली कृतज्ञता पोहोचवून स्मरण करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो.

सर्व पितृ अमावस्या शुभ मुहूर्त

अमावस्या श्राद्ध रविवार, 25 सप्टेंबर 2022

कुतुप मुहूर्त – सकाळी 11:24 ते दुपारी 12:12 पर्यंत

कालावधी – 00 तास 48 मिनिटे

पितृपक्षात प्रतिपदा ते सर्वपित्री अमावस्येपर्यंत वाडवडिलांच्या तिथीनुसार महालय श्राद्ध केले जाते, मात्र तिथी माहिती नसल्यास किंवा कोणत्याही कारणास्तव महालय श्राद्ध राहून गेल्यास किंवा ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केलेले नाही. त्याने केवळ सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध केले तरी पितर तृप्त होतात.

गावागावात सर्वपित्री अमावस्या दिवशी आपल्या अंतर्मनात ज्यांना स्थान आहे अशा व्यक्तींना सपत्नीक घरी बोलावून त्यांचे पूजन करून आपल्या पूर्वजांच्या आवडीचे पदार्थ यथोचित खाऊ घालून यथाशक्ती मानपान दक्षिणा देऊन सर्वपित्री अमावस्ये दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते. या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या किंवा पितृमोक्ष अमावस्या असेही म्हणतात. एखाद्या व्यक्तीला या दिवशी श्राद्ध करण्यासाठी शक्य नसल्यास निदान घरात केलेले जेवण केळीच्या पानावर वाढून एक पान गाईसाठी व एक कावळ्यासाठी ठेवले जाते.

Get real time updates directly on you device, subscribe now.