पुणेकरांनी केलेली ही प्रार्थना अवघ्या जगासाठीच मार्गदर्शक, प्रेरणादायी आणि पथदर्शी ठरो – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : द आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या वतीनं पुण्यात ‘भक्ती उत्सव महासत्संग’आयोजित करण्यात आला होता. श्री श्री रविशंकरजींच्या मार्गदर्शनात हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या साधकांनी एकमुखाने श्री गणरायाची आराधना केली. त्यामुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजींच्या सोबतीनं लाभलं. प्रार्थनेत खूप मोठी शक्ती असते. विक्रमी संख्येनं प्रतिसाद देत जमलेल्या पुणेकरांनी केलेली ही प्रार्थना अवघ्या जगासाठीच मार्गदर्शक, प्रेरणादायी आणि पथदर्शी ठरो, हीच विघ्नहर्त्या चरणी प्रार्थना, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
गुरूदेव श्री श्री रविशंकर यांनी संपूर्ण भारतात आणि जगातील अनेक देशात भारतीय संस्कृती आणि भारतीय अध्यात्म लोकांमध्ये जागृत केले आणि त्यांच्या रुपाने भारतीय संस्कृतीचे संदेश वाहक पहायला मिळाले. जागतिक शांती परिषदेच्या माध्यमातून जगातल्या सर्व धर्मांना एकत्र करण्याचे कार्य गुरूदेवांनी केले. हे करत असताना भारतीय विचारांचे श्रेष्ठत्व स्वामी विवेकानंद यांच्यानंतर जगाला पटवून देण्याचे कार्य गुरूदेवांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला सामुहिक अथर्वशीर्ष पठणाचा जागतिक विक्रम करण्यात आला. या विक्रमाचे प्रमाणपत्र एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसच्या डॉ.चित्रा आणि वर्ड बुक ऑफ लंडनचे डॉ.दीपक हरके यांच्या हस्ते गुरूदेव श्री श्री रविशंकर यांना प्रदान करण्यात आले.