उमेदवार बदलण्याचा निर्णय निश्चितपणे घेता येईल – चंद्रशेखर बावनकुळे

16

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून देखील आता उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. हि निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले, परंतु काँग्रेसने आपली उमेदवारी जाहीर केली. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयन्त केला. वेळ आहे उमेदवार बदलता येईल, असे विधान बावनकुळे यांनी केले आहे.

 

कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ४८ तासात उमेदवार बदलतो , निवडणूक बिनविरोध करणार की? , असे आवाहन महाविकास आघाडीला आले होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील याबाबत म्हटले कि, उमेदवार बदलता येईल. महाविकास आघाडीचा उमेदवार नसेल तर टिळकांना उमेदवारी दिली जाईल. महाविकास आघडीनें आज तसे कळवले तर उद्याचा दिवस बाकी आहे. उमेदवार बदलण्याचा निर्णय निश्चितपणे घेता येईल असे बावनकुळे यांनी म्हटले.

 

बावनकुळे यांनी पुढे म्हटले कि, मुक्ता टिळक आज जर हयात असत्या तर प्रश्नच नव्हता. कोणी कोणाला डावलत नाही. महाविकास आघाडीने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पाठिंबा दिला तर उमेदवार बदलण्याचा विचार करण्यात येईल. भाजप कुणावर अन्याय करत नाही. महाविकास आघाडीने एक पाऊल मागे घेतले तर दोन्ही मतदारसंघाच्या निवडणुका बिनविरोध करायला तयार आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.