कॅलिफोर्नियातील ग्वाडालूपे रिव्हर पार्कमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गायब

न्यूयॉर्क : कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथील उद्यानातून  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा  बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. ग्वाडालूपे  रिव्हर पार्कमधील हा पुतळा   सॅन जोसच्या भगिनी यांनी शहराला भेट  म्हणून दिला होता.  उत्तर अमेरिकेतील शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता.

सॅन जोस डिपार्टमेंट ऑफ पार्क्स , रिक्रिएशन आणि नेबरहुड सर्व्हिसेसने ३ फेब्रुवारी रोजी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये  नमूद करण्यात आले आहे कि, आमच्या समुदायाला कळविण्यास खेद वाटतो कि, ग्वाडालूपे  रिव्हर पार्क येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गहाळ झाला आहे. या ट्विटमध्ये पार्कच्या अधिकाऱ्यांनी पुतळा कधी नेला हे मात्र सांगितले नाही.

या पोस्टमध्ये घोड्यावर बसलेला  छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. हा फोटो पुतळा बेपत्ता होण्यापूर्वीचा आहे.  सोबतच संबंधित विभागाने आणखी एक फोटो जोडला आहे ज्यामध्ये  पुतळ्याचा फक्त पाया शिल्लक आहे.  उद्यान व्यवस्थापन  विभागाने माहिती दिली कि, अधिकारी चोरीचा तपास करत आहेत. हे लँडमार्क चोरीला  गेल्याचे शहराला खूप दुःख झाले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.