Exclusive :राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर दिलीप बराटे यांचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र , काय केली मागणी ?

पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमहापौर दिलीप बराटे यांनी थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्याचे प्रमुख कारण आहे अमेरिकेच्या ग्वाडालूपे रिव्हर पार्क मधून गायब झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा. मागील कहाणी दिवसांपूर्वी अमेरिकेच्या सॅन जोस सिलिकॉन व्हॅली, अमेरिका (SAN JOSE Capital of Silicon valleyAmerica) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळयाची चोरी झाल्याची घटना समोर आली. ग्वाडालूपे रिव्हर पार्कमधील हा पुतळा गहाळ झाल्याची माहिती तेथील अधिकाऱ्याने एका सामाजिक माध्यमाद्वारे पुढे आणली होती. उत्तर अमेरिकेतील हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा होता.

दिलीप बराटे यांनी पंत्रप्रधान मोदींना पत्र लिहून सदर चोरीचा पुतळयाचा तपास पुर्ववत करुन पुतळा पुनर्स्थापना करण्याची मागणी केली आहे.आपल्या पत्रात बराटे म्हणाले आहेत कि महोदय, पुणे महानगरपालिकेच्या वतीने सॅन जोस सिलिकॉन व्हॅली, राजधानी अमेरिका (SAN JOSECapital of Silicon valley America) येथे अंदाजे सन २00३ – 0४ साली येथील महानगर पालिका व मराठी मंडळ यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरुढ पुर्णाकृती पुतळा स्थापन करण्यात आला होता या पुतळयाचा अनावरण समारंभास मी उपमहापौर या पदावर असतांना झाला होता.मी स्वतः या समारंभास उपस्थित होतो. महाराष्ट्र आणि देशासाठी अमेरिकेत अश्वरुढ पुतळा स्थापित झाल्यामुळे गौरवाची बाब झाली होती. सदर ठिकाणी मराठी मंडळानी सॅन जोस महापालिकेकडुन पुतळा बसविण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.गेले दोन दिवस दुरर्शन, वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या माध्यमातुन सॅन जोस अमेरिका SANJOSE America येथील पुतळा चोरीला गेला आहे. अशी बातमी प्रसिध्द होत आहे. सदरची बाब ही अत्यंत गंभीर असून आपल्या देशाच्या अस्तित्वतेवर आघात करण्याचा प्रकार आहे.सदरचा पुतळयाच्या चोरिचा छडा लावुन पुन्हा पुतळा प्रस्थापित होण्यासाठी देश पातळी वरुन पुतळा चोरीच्या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, यासाठी आपल्या देशातील व अमेरिकेतीलशासकीय यंत्रणेचा वापर करण्यात यावा, ही नम्र विनंती. कळावे.

 

दिलीप बराटे हे पुण्यातील अत्यंत संवेदनशील नेते म्हणून ओळखले जातात. राजकारण आणि समाजकारण करताना महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी भान राखत कर्तव्य भावनेतून दिलीप बराटे यांनी पाठविलेल्या पत्रामुळे शिवप्रेमींकडून त्यांचे आभार मानण्यात येत आहेत.

 

शिवप्रेमींमध्ये संताप

सदर घटना समाजमाध्यमांतून समजल्यानंतर संबंध भारतातील शिवप्रेमींनी घटनेचा निषेध व्यक्त केला. संबंधित आरोपींचा तपास करून लवकरात लवकर करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथे सन्मान पूर्वक बसविण्यात यावा हि मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!