मनपा अधिकारी महेश आहेर हल्लाप्रकरणी जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

1

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. जितेंद्र आव्हाड  यांची मुलगी आणि जावई यांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक तथाकथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. या क्लिप वरूनच महेश आहेर यांच्यावर हल्ला करण्यात आलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड आणि मुलगी नताशा यांनी मनपा सहाय्यक आयुक्त यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. व्हायरल व्हिडीओ क्लिपमधील आवाज महेश आहेर यांचाच असल्याचा दावा ऋता आव्हाड यांनी केला आहे.  तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बुधवारी महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या प्रकरणी सात जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्या मतदार संघातील बेकायदा बंणधकामांवर कारवाई केल्याने तसेच त्यांचे ऐकले नाही म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे महेश आहेर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.