पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे क्रीडा संचालनालय व श्री समर्थ व्यायाम मंडळ, इंदापूरच्या वतीने म्हाळुंगे क्रीडा संकुल येथे दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२३ आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील यशवंत मुला-मुलींना पारितोषिकं देण्याच्या सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्य सरकार दिव्यांगांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही या वेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली. सरकारनं दिव्यांगांच्या विकासासाठी राज्यात स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याचे निश्चित केलं असून त्यासाठी समितीही स्थापन झाली आहे. लवकरच या समितीचा अहवाल सादर होईल आणि दिव्यांग विद्यापीठाचा मार्ग सुकर होईल, अशी अपेक्षा या वेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
पाटील म्हणाले कि मी प्रामुख्याने दिव्यांगांशी जोडला गेलो आहे. दिव्यांग कुठेही कमी नाहीत हे नेहमीच दाखवतात. आज स्पर्धा परीक्षांमध्येही हि मुले कुठेही कमी नाहीत याचे उदाहरण चंद्रकांत पाटील यांनी दिले आणि या मुलांचे कौतुक केले.
या वेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, दिव्यांग विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.